कोथळीतील अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोकड लंपास

१५ ग्रॅम सोन्याच्या पोतीसह ५ हजार ६०० रुपयांची रोकड चोरी; मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल
मुक्ताईनगर : कोथळी येथे सुरू असलेल्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान गर्दीचा फायदा घेत एका वृद्ध महिलेच्या जवळील सोन्याचे दागिने, रोकड आणि आधारकार्ड चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नोंदीनुसार, आनंदा तुकाराम पाटील (वय ६०, रा. पोतळी, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी कोथळी येथे आल्या होत्या. दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी २.११ वाजेच्या दरम्यान त्यांच्या खिशातील वस्तू चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या संमतीशिवाय चोरीच्या उद्देशाने वस्तू लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, त्यातील सुमारे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गहू मणी व ३ ग्रॅम वजनाचे पदक, तसेच ५ हजार ६०० रुपयांची रोकड आणि आधारकार्ड, असा मुद्देमाल आहे.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३३/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीची ओळख पटलेली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. २९९१ संदीप वानखेडे करीत आहेत









