• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 29, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता


पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथील प्रकार; बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल

पाचोरा (प्रतिनिधी) – आईची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सांभाळ करण्यासाठी नातेवाईकांकडे ठेवण्यात आलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या संमतीशिवाय प्रौढ तरुणासोबत घरातच लग्न लावून दिल्याचा गंभीर प्रकार पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथे समोर आला आहे. लग्नानंतर अल्पवयीन मुलीला सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप असून, दि. २८ सप्टेंबरपासून तिचा पती तिला सोबत घेऊन कुठेतरी निघून गेल्याची तक्रार तिच्या मोठ्या बहिणीने पाचोरा पोलीस ठाण्यात दिली आहे.

तक्रारीनुसार, पीडित मुलगी ही १४ वर्षे १९ दिवस हिचा सांभाळ करण्यासाठी तिची आजी सुगंधाबाई पुंजाजी गावंडे (रा. कासली, ता. जामनेर) यांच्याकडे ठेवण्यात आले होते. सुमारे आठ महिन्यांपूर्वी तिची आई आशा संभाजी भोसले हिने तिला आजीकडून घेऊन पुनगाव येथील रविंद्र पाटील यांच्या घरी सांभाळ करण्यासाठी ठेवले होते.

दरम्यान, दि. १७ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलगी ही तिच्या बहिणीच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त तितूर-सोयगाव येथे आली होती. त्यावेळी तिच्या निदर्शनास आले आपल्या अल्पवयीन बहिणीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसून आले. याबाबत विचारणा केली असता, पुनगाव येथील रविंद्र पाटील यांच्या मुलगा योगेश रविंद्र पाटील (वय सुमारे २८ वर्षे) याच्यासोबत सुमारे चार महिन्यांपूर्वी घरातच लग्न लावून दिल्याचे सांगितले असे तक्रारीत नमूद आहे.

तसेच लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून आपल्याला त्रास दिला जात असल्याचे त्या अल्पवयीन मुलीने सांगितल्याचा आरोप आहे. मुलबाळ होण्यासाठी आपल्यावर विविध प्रकारचे दोरे-धागे करण्यात येत असल्याचेही तिने बहिणीला सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर दि. १८ सप्टेंबर रोजी मोठी बहिण व तिच्या पतीने त्या अल्पवयीन मुलीला पुनगाव येथे तिच्या सासरी सोडले.

दरम्यान, दि. २८ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीचा पती योगेश याचा फोन बंद येत असल्याने तिच्या आईने मोठ्या जावयाला पुनगाव येथे जाऊन पाहणी करण्यास सांगितले. तो तेथे गेला असता अल्पवयीन मुलगी व तीचा पती योगेश दोघेही घरी आढळून आले नाहीत. घरातील अल्पवयीन मुलीच्या सासुने सांगितले योगेशच्या आजीची तब्येत खराब असल्याने ते तेथे गेल्याचे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर मानवाधिकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा पूनम दीपक खैरनार, मीना प्रकाश बोरसे व शारदा तायडे यांनी अल्पवयीन मुलगी संदर्भात तिची आई आशा संभाजी भोसले यांनी तक्रार केल्याची माहिती तिच्या मोठ्या बहिणीला दिली. तसेच या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिल्यानंतर संबंधित महिलेने पती राहुल भगवान मोरे यांच्यासोबत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही योगेश रविंद्र पाटील याच्यासोबत लग्न लावून दिल्याचा आरोप रविंद्र पाटील व त्यांच्या परिवारातील व्यक्तींवर करण्यात आला आहे. तसेच दि. २८ सप्टेंबरपासून योगेश हा त्यांच्या अल्पवयीन पत्नीला सोबत घेऊन कुठेतरी निघून गेल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी योगेश रविंद्र पाटील (रा. पुनगाव, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून,पाचोरा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. याबाबत प्रारंभिक महिला अपराध समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा पूनम दीपक खैरनार यांचे सहकार्य लाभले.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

योजना पाटील यांनी केले शीत शवपेटीचे लोकार्पण

Next Post

जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगाव तालुक्यात शेतातील शेळी चोरीला; १५ हजारांचे नुकसान!
क्राईम

चाळीसगाव तालुक्यात शेतातील शेळी चोरीला; १५ हजारांचे नुकसान!

November 23, 2026
फैजपूर परिसरात शेतातील साहित्याची चोरी; ७४ हजारांचा मुद्देमाल लंपास!
क्राईम

फैजपूर परिसरात शेतातील साहित्याची चोरी; ७४ हजारांचा मुद्देमाल लंपास!

November 23, 2026
डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची आंतरविभागीय निवड
खान्देश

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची आंतरविभागीय निवड

November 23, 2026
होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा विद्यार्थ्यांना आवाहन
खान्देश

होम व्हिजिटिंगमधून ग्रामीण जनतेत आरोग्य योजनांची जनजागृती करा विद्यार्थ्यांना आवाहन

November 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चाळीसगाव तालुक्यात शेतातील शेळी चोरीला; १५ हजारांचे नुकसान!

चाळीसगाव तालुक्यात शेतातील शेळी चोरीला; १५ हजारांचे नुकसान!

November 23, 2026
फैजपूर परिसरात शेतातील साहित्याची चोरी; ७४ हजारांचा मुद्देमाल लंपास!

फैजपूर परिसरात शेतातील साहित्याची चोरी; ७४ हजारांचा मुद्देमाल लंपास!

November 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon