जळगाव (प्रतिनिधी):- त्रिमूर्ती आर्ट फाउंडेशन संचलित अजंता स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन जळगाव महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या हस्ते पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरी येथे उत्साहात झाले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कलाध्यापक संघ जळगावचे अध्यक्ष श्री. अरुण सपकाळे, माजी अध्यक्ष निलेश चौधरी, सचिव हरीश तळेले , स्वामी समर्थ ग्रुप जळगावचे अध्यक्ष मनोज पाटील, सुप्रसिद्ध चित्रकार निरंजन शेलार तसेच पु. ना. गाडगीळ अँड सन्स जळगावचे व्यवस्थापक गिरीश डेरे उपस्थित होते.


कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध चित्रकृतींचे कौतुक करत त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे आणि कल्पकतेचे प्रदर्शन पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन त्रिमूर्ती आर्ट फाउंडेशनचे संचालक . सुशील चौधरी यांनी केले होते. सूत्रसंचालन उर्वशी चौधरी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी वंदना सुशिल चौधरी भरत चौधरी,राम मोरे ओम पाठक व विद्यार्थ्यांनी मदत केली.









