जळगाव शहरातील बेंडाळे चौकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील पांडे डेअरी चौकातून बेंडाळे चौकाकडे जात असताना भरधाव दुचाकी दुभाजकाच्या खांब्यावर आदळल्याने तरुण जागीच ठार झाला आहे. तर घटनेत आणखी एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मयूर नरेंद्र पाटील (वय २५, रा. खोटे नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, भाऊ, पत्नी व मुलगी यांच्यासह राहत होता. त्यांचे खोटे नगर स्टॉपवर गॅरेज आहे. त्यावरच तो उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)दरम्यान, शनिवारी दि. १३ रोजी रात्री साडे अकरा ते १२ वाजेच्या सुमारास मयूर हा दुचाकीने पांडे चौकाकडून बेंडाळे चौकात जात होता. त्यावेळेला नागोरी चहा समोर खांब्यावरील एका दुचाकीला तो धडकला. या भीषण धडकेत मयूरचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.(केसीएन)सदर मयूर सोबत आणखी एक जयेश नामक तरुण असल्याची माहिती मिळाली. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.