• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आयुर्वेदिक कंपनीच्या नावाखाली देशी दारूचा कारखाना, उत्पादन शुल्काची धडक कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
आयुर्वेदिक कंपनीच्या नावाखाली देशी दारूचा कारखाना, उत्पादन शुल्काची धडक कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट, ५ जणांना अटक

जळगाव (प्रतिनिधी) : आयुर्वेदिक शीतपेय निर्मितीच्या नावाखाली देशी दारु तयार करणाऱ्या जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरामधील कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून ४५ हजार दारुच्या सीलबंद बाटल्यांसह ७५ लाख ६४ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवार दि. ४ मे रोजी पहाटे करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठिकठिकाणी तपासणी, कारवाई केली जात आहे. त्यात जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरात बनावट देशी दारु निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार पथक के – १० सेक्टरमध्ये पोहचले. त्या ठिकाणी मंदार आयुर्वेदीक प्रोडक्ट या नावाच्या कंपनीत जाऊन पाहणी केली असता तेथे शीतपेयाच्या नावाखाली अवैधरित्या बनावट देशी दारुची निर्मिती केली जात असल्याचे आढळून आले.

मध्यरात्री अडीच वाजता पथक बनावट देशी दारुच्या कारखान्यावर पोहचले असता दरवाजा बंद करून आतमध्ये पाच जण बनावट मद्याची निर्मिती करून ती बाटलीत भरत असल्याचे आढळून आले. या पाचही जणांना पथकाने अटक केली. कंपनीच्या ठिकाणी देशी दारु रॉकेट संत्रा ब्रॅण्डचे ९० मि.ली. क्षमतेच्या ४५ हजार सीलबंद बाटल्या ठेवलेले ४५० बॉक्ससह देशी दारुने भरलेले बॅरलही आढळून आले. ४६ लाख २५ हजार रुपयांच्या दारुसह प्रत्येकी एक हजार लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक टाक्या, प्रत्येकी २०० लिटर क्षमतेच्या दोन स्पिरीटच्या रिकामाच्या टाक्यादेखील तेथे आढळून आल्या.

कंपनीमध्ये ९० मि.ली. क्षमतेच्या एक लाख रिकाम्या बाटल्या, ८० हजार पत्री बूच, बॅच क्रमांक असलेले दोन लाख लेबल, रॉकेट संत्र्याचे पुठ्ठे, पार्टीशन, लेबल पट्टीचे मशीन, सील करण्याचे मशीन, पाण्याच्या मोटार, नळी, आरओ मशीन, एमएच १९, सीवाय ३९३२ क्रमांकाचे मालवाहू वाहन, एक फ्रीज, कुलर, टेबल, स्टूल, फॅन, दोन मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले. बनावट मद्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजताच अधीक्षक डॉ. व्ही.टी. भूकन, निरीक्षक डी.एम. चकोर, दुय्यम निरीक्षक एस.बी. चव्हाणके, एस.बी. भगत, सी.आर. शिंदे, राजेश सोनार, विठ्ठल बाविस्कर, जवान गिरीश पाटील, सुरेश मोरे, पी.पी. तायडे, दिनेश पाटील, गोकूळ अहिरे, धनसिंग पावरा, एस.आर. माळी, विपूल राजपूत, आर.टी. सोनवणे, व्ही.डी. हटकर, एम.एम. मोहिते, आर.डी. जंजाळे, नंदू पवार यांचे पथक सदर कारखान्याच्या ठिकाणी धडकले. कारवाई करत तीन ट्रक भरून मुद्देमाल जप्त करण्यात आला.कारवाईदरम्यान सकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास विभागीय निरीक्षक डी.एम. चकोर करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/aayurvedik-company-deshi-daru/
Previous Post

भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्यासाठी शिंदे गटाचे अमोल पाटील यांचा प्रचार सुरु

Next Post

कबुतर पकडणे बेतले जीवावर, दोन अल्पवयीन मित्रांचा बुडून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कबुतर पकडणे बेतले जीवावर, दोन अल्पवयीन मित्रांचा बुडून मृत्यू

कबुतर पकडणे बेतले जीवावर, दोन अल्पवयीन मित्रांचा बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon