शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उंचावले नाव
जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची विद्यार्थिनी अर्चना पंजाबी हि द्वितीय वर्षाची असताना राज्यभरातून सर्व विषयात पाचवी आली होती. तिला आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे मेरिट प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. तिच्या यशाबद्दल गुरुवारी २० जुलै रोजी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी पुष्पगुच्छ व मेरिट प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
अर्चना महेश पंजाबी या विद्यार्थिनीने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात उत्तम कामगिरी करून राज्यभरातून ती विद्यापीठ पातळीवर पाचव्या क्रमांकावर आली होती. तसेच, औषधशास्त्र विषयात ती पूर्ण विद्यापीठातून प्रथम होती. यामुळे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव उंचावले होते. या विद्यार्थिनीला आता मेरिट प्रमाणपत्र विद्यापीठाकडून देण्यात आले आहे.
अर्चना महेश पंजाबी सध्या रुग्णालयातच रुग्णसेवेत असून आंतरवासीता प्रशिक्षण घेत आहे. गुरुवारी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते तिला पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ.प्रवीण लोहार, डॉ. जोतीकुमार बागुल, डॉ. हर्षल महाजन, डॉ. रितेश सोनवणे, विद्यार्थी विभागाचे कार्यालय अधीक्षक समीर देवसंत, किरण बावस्कर, गणेश धनगर, संदीप सोनकुसरे, स्नेहल पाटील आदी उपस्थित होते.