अहमदनगर (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यातील हळगाव या ठिकाणी शेततळ्यामध्ये आईसह त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. पाण्यात बुडून या तिघांचा मृत्यू झाला आहे. ही हत्या आहे की आत्महत्या या बाबत पोलीस कसून तपास करीत आहे.
घटनेतील मयत मुलांची आई चांदणी (उर्फ) उमा बबन पाचरणे (वय ३१ वर्ष रा. हळगाव) ही आपल्या दिपाली बबन पाचारणे (वय ११ वर्ष) व राजवीर बबन पाचारने (वय ८ वर्ष) या दोन मुलांसह सोमवार दि १० जुलै रोजी हळगाव येथिल रहात्या घरातुन बेपत्ता झाली होती. दिवसभर तीच्या घरच्यांनी शोधाशोध केली. मात्र हे तीघेही आढळून आले नाही. त्यामुळे मयत महीलेचे पती बबन पाचरणे यांनी दि ११ जुलै रोजी जामखेड पोलीस स्टेशनला पत्नी व दोन मुले हरवले आहेत अशी तक्रार दाखल केली.
यानंतर बुधवार दि १२ रोजी भीमराव महादु पिंपळे रा. हळगाव यांच्या शेतातील गट नंबर ४३४ मधील शेत तळ्यामध्ये आई चांदणी (उर्फ) उमा बबन पाचरणे, दिपाली बबन पाचारणे, राजवीर बबन पाचारणे या तीघांचे मृतदेह शेततळ्यातील पाण्यावर तरंगताना आढळून आले. या घटनेची माहिती तातडीने परीसरातील लोकांनी हळगाव येथिल पोलीस पाटील सुरेश यशवंत ढवळे यांना कळवण्यात आली. या नंतर पोलीस पाटील सुरेश यशवंत ढवळे रा. हळगाव यांनी ही माहिती जामखेड पोलीस स्टेशनला कळवली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील, सपोनि सुनील बडे हे आपल्या पथकासह घटना घडली त्या ठिकाणी दाखल झाले.
यानंतर तीनही मृतदेह शेततळ्यातून गावकऱ्यांच्या मदतीने शेत तलावाच्या बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी जागीच दोन वैद्यकीय अधिकारी यांना बोलून तीनही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोनि महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बडे हे करीत आहेत.