लातूर ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील चाकूर मुलाने आईवरच्या प्रेमापोटी ” आईचं मंदिर ” उभारलं आहे . आईचं मंदिर उभारल्या गेल्याने मुलाची आईवरची श्रद्धा चर्चेला आली आहे. आई-वडिलांना वृद्धश्रमाची वाट दाखवणाऱ्या मुलांना आईचं हे मंदिर डोळ्यात अंजन घालणारं आहे.
चाकूर इथल्या काशीबाई सोनटक्के याचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं आईच्या आठवणी या मंदिराच्या स्वरूपात जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने शिवकुमार यांनी हे मंदिर उभारले आहे. काशीबाई या हयात असताना त्यांच्या मुलांनी त्यांची मनोभावे सेवा केली. आई-वडिलांची सेवा कशी केली जाते याचा आदर्शच शिवकुमार आणि त्यांच्या भावंडानी घालून दिला आहे . आईच्या या मंदिरातच मी रमतो ,माझं जेवण देखील इथंच करतो असं शिवकुमार सांगतात.
काशीबाई यांना तीन मुले आणि तीन मुली आहेत. या सगळ्या मुलांचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे आई गेल्यावर देखील मंदिराच्या माध्यमातून श्रद्धा फुलून वाहते आहे.