जळगाव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या जिल्ह्यातील 34 पैकी 24 लाभार्थ्यांना आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लाभाचे धनादेश वाटप करण्यात आले. उर्वरित 9 लाभार्थी यावेळी अनुपस्थित होते. जळगावच्या तहसिलदार कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येकी 20 हजार रूपयांचा धनादेश प्रत्येक लाभार्थ्याला देण्यात आला.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना ही दुर्घटनेत दगावलेल्यांच्या वारसांना आधार देणारी योजना आहे. या वीस हजारांच्या मदतीने त्यांना कितपत आधार मिळेल हे मलाही नक्की सांगता येणार नाही परंतू मदतीचा हात पुढे करणारी ही योजना आहे, त्यामुळे काहीतरी सहारा या लाभार्थ्यांना मिळेल. तहसीलदार वैशाली हिंगे म्हणाल्या की, ही अतिशय छोटी मदत आहे.गेल्या तीन महिन्यांत आलेले हे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातील महिलाही कमावत्या असतात. शेतमजुरी करून त्या कुटूंबाला हातभार लावतात त्यामुळे या योजनेत घरातील कर्ती महिला दगावली असेल तरी तिच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळतो. जळगाव तालुक्यातील 31 गावांमधील लोकांना हा लाभ मिळालेला आहे. आज जे लाभार्थी हजर राहू शकले नाहीत त्यांना त्यांचे मदतीचे धनादेश संबंधित तलाठ्यामार्फत घरपोच दिले जाणार आहेत. त्यांना ते बँकेतून वटवून घेण्याबद्दल तलाठी मदत करतील, एकूण 6 लाख 80 हजार रूपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे.
पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील , शिवसेना तालुकाप्रमुख राजू चव्हाण, पंचायत समिती सदस्यांचे पती कमलाकर पाटील, तुषार महाजन, मुकेश सोनवणे, जळक्याचे माजी सरपंच रमेशअप्पा पाटील, माजी पं.स. सदस्य विश्वनाथ पाटील , तहसीलदार वैशाली हिंगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नायब तहसीलदार शितल सावळे, कर्मचारी ज्योती चौधरी, अर्चना पवार, बिर्हाडे, सपकाळे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला होता. श्रीमती जिजाबाई कोळी ( विदगाव), निर्मलाबाई सपकाळे ( कठोरा), दशरथ माळी ( आसोदा), रूख्माबाई सपकाळे(फुपणी), शकुंतला पाटील ( ममुराबाद), भारती सोनवणे (कानसवाडे), मंगलाबाई सपकाळे ( कठोरा), लता सोनवणे ( नांद्रा बु.), अंजना सोनवणे ( कठोरा),संगीता सपकाळे ( सावखेडा खूर्द), चंद्रकला धनगर (रायपूर), प्रकाश सपकाळे (फुपणी), वर्षा सोनवणे ( आमोदा खूर्द),अलका धुमाळ (चिंचोली), गायत्री इंगळे (कानळदा), रमिला राजपुत (तरसोद), प्रमिला साठे ( दापोरा), संगीता काळे ( कंडारी), सुनंदा जाधव (वसंतवाडी), सिमा काळे (कंडारी), उषा सपकाळे ( कठोरा), चित्रा नारखेडे ( ममुराबाद), रुख्माबाई गोपाळ ( जवखेडा), रामकोरबाई पाटील ( विदगाव) अशी या आज धनादेश वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची नावे आहेत.