तुरळक प्रवाशांची गर्दी ; रेल्वेसुरक्षा बलाचा चोख बंदोबस्त
जळगाव ;- देशात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. देशात कोरोना विषाणूचा धोका पाहता भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत महत्त्वाचा निर्णय़ घेतला आहे. 31 मार्चपर्यंत देशातील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला असून त्या पार्शवभूमीवर आज दुपारी जळगाव रेल्वेस्थानकाची पाहणी केली असताना अगदी तुरळक प्रवासी बाहेरगावचे आढळून आले . त्यांनी कसेतरी स्टेशन गाठून आपल्या इच्छित स्थळी रिकाम्या असणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करत आपल्या गावाला मार्गस्थ झाल्याचे चित्र दिसून आले. यावेळी रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱयांनी चोख बंदोबस्थ ठेवला होता.
ज्या गाडीचा प्रवास पूर्ण झाला आहे अशा गाड्या त्वरित थांबवण्यात येतील. सध्या 400 मालगाड्या धावत आहेत आणि गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर ते बंद केल्या जातील. कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
रेल्वेने सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या एक्सप्रेस आणि इंटरसिटी ट्रेन बंद केल्या आहेत. 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत ही रेल्वे सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारतीय इतिहासातील हा एक मोठा निर्णय आहे.दरम्यान एरव्ही गर्दीने फुल्ल असणारे जळगाव रेल्वेस्थानक प्रवाशांविना दिसून आले . तसेच येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन या रिकाम्या दिसत असून एखाद दुसरा प्रवासी प्रवास करताना दिसत असलयाचे चित्र स्टेशनवर दिसून आले.