जळगाव – कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आदेशाने दि.२३ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने जळगाव जिह्यातील सर्व रुग्णालयातील दैनंदिन वैद्यकीय सेवा बंद करण्याचा निर्णय आयएमएच्या जळगाव शाखेने घेतला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.तसेच या काळात वैकल्पिक शस्त्रक्रिया देखील बंद ठेवाव्या असे आयएमए चे सचिव डॉ धर्मेंद्र पाटील यांनी सर्व डॉक्टरांना सूचित केलेले आहे. हा निर्णय जिह्यात लॉक डाऊन असे पर्यंत राहील.
रुग्णालयात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याने रुग्णासोबत केवळ एकाच नातेवाईकाने थांबावे, डॉक्टरांशी योग्य ती काळजी घेऊन, योग्य अंतर ठेवून संपर्क साधावा, रुग्णालयाच्या प्रतिक्षालयात गर्दी करू नये, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी देखील योग्य ती खबरदारी घ्यावी या संदर्भातील बोर्ड प्रत्येक रुग्णालयात लावण्यात आला आहे.रुग्ण, रुग्णालयातील कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे ,असे आयएमए चे सचिव डॉ.धर्मेंद्र पाटील ,अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी यांनी कळविले.