पुणे ;- भूखंड घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. फडणवीसांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार अंजली दमानिया यांनी केली आहे.

एकनाथराव खडसे यांच्या बैठकीतील सगळे पुरावे- मिनिट्स ऑफ मीटिंग रद्द करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
एकनाथराव खडसेंना 30 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे ईडीचे समन्स मिळाले होते. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथराव खडसेंना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती.
ईडीच्या नोटीसनंतर एकनाथ खडसेंनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली होती. मात्र ईडीसमोर हजर राहण्यापूर्वीच एकनाथराव खडसेंना कोरोनाची लागण झाली होती.







