कजगाव ता भडगाव ‘=येथे बेमोसमी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी आमदार किशोर पाटील प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार माधुरी आंधळे यांनी केली
कजगाव व परीसरात शनिवारी संध्याकाळी बेमोसमी पावसाने जोरदार झोडपल्याने शेतकऱ्यांचा होता तोंडाशी आलेला घास हिरावणून नेला आहे त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तब्बल एक तास चाललेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणावर आहाकार माजवला होता त्यामुळे शेतातील मका गहू ज्वारी बाजरी ह्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः पिके जागेवरच झोपून गेल्याचे दिसून येते तर फळ बागांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे बेमोसमी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आमदार किशोर पाटील प्रांताधिकारी राजेंद्र कचरे तहसीलदार माधुरी आंधळे मंडळ अधिकारी बी डी पाटील तलाठी उमेश पाटील गायत्री पाटील कोतवाल नितीन मोरे शेतकरी कैलास पाटील राजेंद्र पाटील विलास पाटील अतुल पाटील निलेश देवरे कुमारसिंग पाटील नितीन देवरे व अनेक शेतकरी उपस्थित होते