• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्रातील गांधीजी याविषयावर झाला दाम्पत्याची पीएच.डी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 7, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कृषी क्षेत्रातील प्रख्यात उद्यमी तसेच गांधी विचारांची ट्रस्टीशीप स्वीकारणारे, तत्त्वशील विचारवंत, चिंतक श्रद्धेय डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहयोगी अश्विन झाला आणि त्यांच्या पत्नी निर्मला झाला यांनी नुकतीच गुजरात विद्यापीठाद्वारा पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे.

‘गांधीजींच्या सार्वजनिक कामांसाठी आर्थिक साधने संकलनः प्रयत्न, पद्धती आणि व्यवस्थापन’ या विषयात अश्विन झाला यांनी संशोधन केले. जैन हिल्स स्थित गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये झालाजी कार्यरत आहेत. गांधीजींच्या फंड रेझिंग या विषयासंदर्भातील हे प्रथम संशोधन आहे. श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठया भाऊंनी त्यांना गांधी रिसर्च फाऊंडेशन रेसिंडेट स्कॉलरसाठी संशोधन करावे अशी प्रेरणा दिली होती. गांधीतीर्थ मधील वाचनालयातून झाला दाम्पत्यास संशोधनासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. अश्विन झाला यांच्या पत्नी निर्मला झाला यांनीही त्याच कालवधित भवरलालजींच्याच प्रेरणेने ‘महाराष्ट्रातील गांधीजीः कालगणना, प्रसंग आणि कृती’ या विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. प्रस्तुत विषयही भवरलालजींनी सूचवला होता. गुजराथ विद्यापीठात त्यांचे प्रबंध ऑनलाईन सादर झाले. सद्यपरिस्थितीत व्हायवाही ऑनलाईन घेण्यात आला.

परीक्षकांनी त्यांच्या संशोधनासाठी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) ही मानद पदवी देण्याची शिफारस करत उभयतांच्या कामाची गुणवत्ता आणि संशोधनाची प्रशंसा केली. अभिनंदनीय बाब म्हणजे गुजरात विद्यापीठाने दोन्ही प्रबंध तीन वेगवेगळ्या भाषेत म्हणजे गुजराथी, हिंदी आणि इंग्रजीत मुद्रित करण्याचे निश्चित केले असून मराठीतही भाषांतरीत करण्याची सूचना केली आहे. झाला दाम्पत्य गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये सहकारी या नात्याने वर्ष 2010 पासून म्हणून कार्यरत आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या व्यवस्थापन सदस्यांनी फाऊंडेशनने पुरस्कृत केलेल्या या दोन्ही सहकाऱ्यांच्या पीएच.डी संशोधनाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आहे. झाला दाम्पत्यास गुजराथ विद्यापीठाचे डॉ. सुदर्शन अय्यंगार यांचे मार्गदर्शन लाभले. या दोघं अभ्यासकांनी आपले संशोधनपर प्रबंध आदरणीय भवरलालजींना अर्पण केले आहेत.


 

 

Previous Post

मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर की एकत्रित लढणार? अजित पवारांनी केले स्पष्ट

Next Post

लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रलतर्फे “मातोश्री आनंदाश्रम” येथे अन्नदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रलतर्फे “मातोश्री आनंदाश्रम” येथे अन्नदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon