• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डेंग्यु प्रतिरोध उपाययोजना : एक दिवस एक कार्यक्रम नागरीकांनी आठवड्यतील एक दिवस कोरडा दिन म्हणून पाळावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 14, 2020
in जळगाव
0

जळगांव,;- आरोग्य विभाग तसेच महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी व वैद्यकिय अधिकारी यांना जिल्ह्यात डेंग्यू ताप वाढणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक व नियंञणात्मक उपाययोजना राबविण्यात सूचना दिल्या आहेत. डेंग्यूविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रिय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांद्वारे जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात व शहरी भागात नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करणे याकरिता पूर्ण महिनाभरात ‘एक दिवस-एक कार्यक्रम’ घेण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात दिलेल्या तारखेला जलद ताप सर्वेक्षण, प्रदर्शनाचे आयोजन, सर्व स्तरावर रॅलीचे आयोजन, गप्पी मासे सोडणे, डेंग्यू ताप आजाराविषयी सर्व ठिकाणी सभाचे आयोजन, दिंड्या, प्रभात फेरी, चिञकला स्पर्धा, हस्तपञिका वाटप, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू या विषाणूमुळे होतो. एडिस इजिप्ताय डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित होतो. हा एक तीव्र फ्ल्युसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासांच्या चाव्यानंतर 5 ते 6 दिवसांनंतर मनुष्याला हा आजार होतो. या आजाराचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.

डेंग्यू तापाची लक्षणे – डेंग्यू ताप-लहान मुलांमध्ये मुख्यत: सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठया माणसांमध्ये अधिक तीव्र स्वरुपाचा ताप, डोकेदुखी, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचे चट्टे येऊ शकतात. अंगदुखी तीव्र स्वरुपात असू शकते. म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.

एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोक्याच्या मागील भागात वेदनाची डोळयांच्या हालचालीसोबत अधिक होते, चव आणि भूक नष्ट होणे, त्वचेवर व्रण उठणे.

डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप – डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा गंभीर स्वरुपाचा प्रकार असून यात तापाबरोबर बाह्य रक्तस्त्राव, चट्टे उठणे, हिरडयांमधून रक्तस्त्राव, अंतर्गत रक्तस्त्राव, आतडयांमधून रक्तस्त्राव, प्लेटलेटची संख्या कमी होणे, इ. लक्षणे आढळून येतात. तसेच छातीत व पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणे असतात.

तीव्र व सतत पोटदुखी, नाक, तोड आणि हिरडयांतून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे, रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे, झोप येणे आणि अस्वस्थता वाटणे, रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडते, नाडी कमकुवतपणे जलद चालते, श्वास घेतांना त्रास होणे,

डेग्यू तापाचा प्रसार – आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू (एडीस इजिप्ती) जातीच्या डासाच्या मादीमार्फत दुस-या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. हे डास साधारणपणे समुद्रसपाटीपासून एक हजार मीटरपर्यंतच्या भागात जिवंत राहतात. याच्या साथी वेगाने पसरु शकतात. एडीस इजिप्ती हा एक लहान काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे चट्टे असतात. त्याचा आकार अंदाजे 5 मिली मीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला 7 ते 8 दिवस घेतो. नंतर रोगाचा प्रसार करतो. साधारणपणे हा डास दिवसा सकाळी अथवा संध्याकाळी चावतो. हा आजारा संसर्गजन्य नाही.

प्रतिबंधात्मक उपाययोजना – डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला पसरण्यापासून थांबवू शकतो, घराच्या आजूबाजूला पाणी साठवू न देणे, वेळच्या वेळी साठलेले पाणी रिकामे करणे, आपल्या घराभोवती पाणी साचु देऊ नका, घरातील पाण्याचे सर्व साठे शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक वार निश्चित करुन रिकामे करावे. या साठयातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरडे करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत, अंगण व परिसरातील खड्डे बुजवावे त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी, झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावे, पांघरुन घेवुन झोपावे, झोपतांना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा, घराच्या छतावरील पाणी साचु देवु नये व फुटके डब्बे टाकाऊ टायर्स, कप, मडकी इ. ची वेळीच विल्हेवाट लावा, गुरेढोरे तसेच पाण्यासाठी ठेवलेली भाडी दोन दिवसांनी स्वच्छ कोरडी करावी, घरातील कुलर्स व फुलदाणी दररोज नियमित स्वच्छ व कोरडी करावी. संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा, दर आठवड्याला नाल्यांमध्ये रॉकेल किंवा क्रुड ऑईल टाकावे, डास उत्पत्तीस्थळात गप्पी मासे सोडणे,

वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही, वेळीस केलेले उपाय तुम्हाला होणा-या आजारापासून दूर ठेवीन त्यासाठी किटकजन्य आजारांवर नियंत्रण होण्यासाठी सर्वानी हातभार लावावा. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


 

 

Previous Post

जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध शेतकरी बांधवांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

Next Post

‘आयडीएम स्कूल फॉर बनाना’ या उपक्रमात शेतक-यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

‘आयडीएम स्कूल फॉर बनाना’ या उपक्रमात शेतक-यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

पंचकर्म उपचार सुविधा ; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा उपलब्ध

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

June 12, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या
1xbet russia

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

पंचकर्म उपचार सुविधा ; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा उपलब्ध

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon