अमळनेर;- येथील ग्रामीण रुग्णालयातील मुख्य अधि.परिचारीका यांनी खोकल्याचे ओषध नदिल्याने दीपक पाटील या इसमाने कामकाजात अडथळा व हात पकडून विनयभंग केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामिण रुग्णालय अमळनेर येथे अधि.परिचारीका या कर्तव्यबजावत असतांना भालेराव नगर मधील रहिवासी असलेले दिपक प्रतापराव पाटील हा अत्यावश्यक विभागात आला असता त्याचा केस पेपर नोंद करून आजारपणाबाबत विचारना केले असता त्यांने सांगितले की,मला दोन ते तीन दिवसापासुन खोकला येतो आहे मला खोकल्याचे औषध द्या त्यावेळी ग्रामिण रुग्णालयातील औषध वाटप विभाग हा बंद असुन आपण उद्या सकाळी येवुन खोकल्याचे औषध घेवुन जा असे सांगून खोकल्याच्या गोळ्यादिल्या असता फिर्यादी वर रागावुन म्हणाला की, मला आताच खोकल्याचे औषध पाहिजे जर या गोळ्यानी माझा मुत्यु झाला तर ? असे बोलल्याने म्हणुन फिर्यादीने सदरच्या गोळ्या त्याच्या कडुन परत घेत असतांना त्यांने माझा उजवा हात वाईट उद्देशाने पकडला त्यावेळेस फिर्यादी ने आवाज दिल्याने सुरक्षा रक्षक दिपक भास्कर पाटील,श्रीमती सुवार्ता मोजेस वळवी,व ईश्वर वसंत बडगुजर आले व त्याची समजुत काढुन त्यास घरी पाठवण्याचा प्रयत्न करीत असतांना आरोपीने फिर्यादिस तुम्ही येथे नोकरी कसे करतात ?मी तुम्हाला पाहुन घेईन,
असे असे बोलुन शासकीय कामात अटकाव निर्माण केला. म्हणुन त्यांच्या विरुध्द कायदेशीर फिर्याद अमळनेर पोलीस ठाण्यात भादवी कलम 354,186 नुसार नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास पोना सुनिल हाटकर करीत आहे