अमळनेर तालुक्यातील घटना
अमळनेर ( प्रतिनिधी ) – जन्मदात्या बापानेच ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना १९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली.
मध्यप्रदेशातील सेंधवा तालुक्यातील धांदरा येथील एक महिला पती दारूमुळे मेल्याने रेल्वेत भीक मागत होती. भीक मागताना तिची ओळख एका गावातील रवींद्र रणछोड पारधी याच्याशी झाली होती. त्याने मुलीसह महिलेला येथे आणून झोपडीत राहू लागले होते. रवींद्र बांधकाम मजूर म्हणून काम करीत होता. मात्र चार पाच महिन्यांपासून त्याला दारूचे व्यसन लागल्याने तो महिलेला मारहाण करीत होता. तिला रेल्वेत भीक मागायला पाठवू लागला. महिला सुरत भुसावळ मार्गावर भीक मागून उदरनिर्वाह करीत होती. दिनांक १९ रोजी भीक मागून ती परत आली असता तिला झोपडीत रवींद्र पारधी हा तिच्या ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत असताना दिसून आला.
रवींद्रने महिलेला घराबाहेर पडू न दिल्याने महिलेला पोलिसात फिर्याद देता आली नाही. मारवड पोलीस स्टेशनला महिलेने फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी रविंदविरुद्ध पोक्सो कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी रवींद्रला अटक करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.