• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला मुदतवाढ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 3, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पावसाळ्यात दक्षता बाळगून वीज अपघात टाळा – इब्राहीम मुलाणी

राज्यातील ६५ हजार ४४५ वीज ग्राहकांनी घेतलाय लाभ

जळगाव (प्रतिनिधी) :- बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.

राज्यातील महावितरणच्या दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी दि. १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली होती. योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी संपत असून सदर योजनेस एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील ६५ हजार ४४५ वीज ग्राहकांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून ८६ कोटी रुपयांचा भरणा झाला असून त्यांना ४४ कोटी ३५ लाख रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ झाला आहे. नागपूर परिमंडळातील ७५९२ वीज ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला असून हे परिमंडळ पहिल्या क्रमांकावर आहे.

कोल्हापूर परिमंडळ (६१०१ ग्राहक) आणि पुणे परिमंडळ (५८९३ ग्राहक) ही परिमंडळे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. विभागांमध्ये नागपूर विभाग २०,४०० लाभार्थी ग्राहकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्या नंतर कोकण विभाग (१७,७९८), पुणे विभाग (१७,४४८) व छत्रपती संभाजीनगर (९८१८) यांचा क्रम लागतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत आहे. भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, शीळ व कळवा या महावितरणच्या फ्रांचायजी क्षेत्रातील वीज ग्राहकांनाही ही योजना लागू आहे. संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक 1912 किंवा 18002333435 किंवा 18002123435 या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.


 

Tags: #jalgaon #dhule #nandurbar mahavitraran news #maharashtra #bharat
Previous Post

दर्जेदार विद्युत सेवा देण्यासाठी कृती आराखडा तयार ठेवावा

Next Post

केंद्र प्रमुखांसह मुख्याध्यापकांनी घेतले तालुकास्तरीय शालेय सुरक्षा प्रशिक्षण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
केंद्र प्रमुखांसह मुख्याध्यापकांनी घेतले तालुकास्तरीय शालेय सुरक्षा प्रशिक्षण

केंद्र प्रमुखांसह मुख्याध्यापकांनी घेतले तालुकास्तरीय शालेय सुरक्षा प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon