• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महायुतीची एकतर्फी होणार लढत कि दिसणार महाविकास आघाडीचा जोर ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 19, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जामनेर मतदारसंघात ग्रामविकासमंत्र्यांविरोधात खोडपे गुरुजींचा लागणार कस

विश्लेषण : जामनेर विधानसभा मतदारसंघ

जळगाव (विशेष प्रतिनिधी) :-  जामनेर विधानसभा मतदार संघामध्ये यंदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने भाजपमधून आलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप बळीराम खोडपे यांना तिकीट दिले आहे. प्रचारामध्ये खोडपे यांना मिळालेली लोकप्रियता पाहता यंदाचा निकाल नेमका कसा लागेल याकडे आता जनतेलाही उत्सुकता लागून राहिली आहे.

भाजपचे प्रभावशाली नेते मंत्री गिरीश महाजन हे १९९५ पासून जामनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आता सातव्यांदा ते उमेदवारी करीत असून सलग ६ वेळा जिंकून आल्याचा विक्रम त्यांनी केला आहे. आता सलग ७ वेळा निवडून येण्याचा मान मिळवून जळगावचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची त्यांना संधी मिळाली आहे. २०१९ साली मंत्री गिरीश महाजन यांना १ लाख १४ हजार ७१४ एवढी मते मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय गरुड यांना ७९  हजार ७०० मते मिळाली होती

जामनेर विधानसभा मतदारसंघात ३ लाख ३५ हजार ४७४ एकूण मतदार असून पुरुष १ लाख ७२ हजार २३२ तर महिला १ लाख ६३ हजार ४१ याशिवाय १ तृतीयपंथीय मतदार आहे. पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले दिलीप बळीराम खोडपे यांना यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्याने तगडा प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांच्यासमोर उभा करण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. प्रचारांमध्ये देखील दिलीप खोडपे यांना चांगली पसंती दिसून आली.

यंदा मंत्री गिरीश महाजन हे सातव्यांदा विजयी होऊन माजी मंत्री सुरेशदादा यांच्या विक्रमाशी बरोबरी करतील की मतदारसंघाला नवीन उमेदवार आमदार म्हणून मिळेल याबाबत जनतेमध्ये उत्सुकता लागली असून निकालाच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होणार आहे. तसेच मतदानाची टक्केवारी देखील खूप काही सांगून जाणार आहे. इतर प्रमुख उमेदवार मतदार संघात दिसून येत नसल्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता नाही.


 

 

Tags: #jamner vidhansabha matdar
Previous Post

केंद्रावर नदीतून जात चक्क बैलगाडीवरून नेले ईव्हीएम मशीनसह साहित्य !

Next Post

ब्रेकिंग : जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी, बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ब्रेकिंग : जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी, बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू

ब्रेकिंग : जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी, बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारणे पडले महागात; दोघांवर चॉपरने हल्ला

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
1xbet russia

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई ;६ लाख ११ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारणे पडले महागात; दोघांवर चॉपरने हल्ला

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

‘ऑपरेशन ३/२५’चा प्रभावी प्रयोग; शस्त्र गुन्हेगारांच्या घरांची पहाटेच झाडाझडती

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon