ममुराबाद, मोहाडी, डोणगावसह आव्हाणी परिसरात प्रचारसभा !
जळगाव (प्रतिनिधी) : माझ्यासारखा सामान्य माणूस बाळासाहेबांच्या पुण्याईने आणि जनतेच्या आशीर्वादामुळे पुन्हा निवडणुकीत उभा राहिलो आहे. सुखदुःखात जोडलेल्या जनतेचे आशिर्वाद याही निवडणुकीत मिळावेत, असे प्रतिपादन ग्रामीण मतदारसंघातील महायुतीमधील शिंदे सेनेचे उमेदवार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
ममुराबाद, मोहाडी, डोणगाव, आव्हाणी, फुलपाट, धानोरा, टाकळी या भागात पाटील यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. आपण गावोगावी रस्ते, मुलभूत सुविधा देवून पूल बांधले आणि गावं जोडण्याचे काम केले. जनतेच्या सुखदुःखात जावून माणसं जोडण्याचे काम केल्याचे ते म्हणाले.
ममुराबाद येथे खंडेराव महाराज मंदिराची ३ कोटींच्या निधीतून सुधारणा, या भागातील विविध गावात रस्ते, पूल, स्मशानभूमी, ट्रान्स्फार्मर आणि शेतकरी, शेतीरस्ते, नवी ग्रामपंचायतभवन बांधून लेंडी नाला, पिंप्राळा रोड, कानळदा रस्ता व लवकी नाल्यावर चार पूल केल्याने तसेच मुस्लिम वस्तीतही अनेक कामे झाल्याने ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत केले. मोहाडीत घोड्यावरून, ममुराबादमध्ये जीपमधून रॅली काढण्यात आली.
जिल्हाप्रमुख निलेश पाटील, संजय पाटील, डी. ओ. पाटील, शिवराज पाटील, जि. प.चे माजी सदस्य पवन सोनवणे, जनार्दन कोळी, अनिल भोळे, तुषार महाजन, ममुराबादचे महेश चौधरी, सरपंच हेमंत चौधरी, शैलेंद्र पाटील, संतोष कोळी, निखिल पाटील, अनिस पटेल, ईजाज पटेल, मोहाडी सरपंच डंपी सोनवणे, भगवान पाटील, गणेश पाटील, नाना पाटील, दोणगाव बुद्धक व खुर्द किशोर पाटील, सरपंच भागवत पाटील, ज्योती शियदे, पुष्पाताई पाटील, आव्हाणेत सदाशिव पाटील, सचिन पाटील, तुषार पाटील, फुलपाट येथे हरिभाऊ पाटील, भिमसिंग पाटील, टहाकळीत जितू चव्हाण, मधुकर पाटील, सुनील पाटील उपस्थित होते.