जळगाव शहरातील मुंदडा नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील पिंप्राळा भागातील मुंदडा नगर येथे वाळलेले कपडे काढण्यास गेलेली तरुणी घराच्या चौथ्या मजल्यावरून पडून मयत झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दि. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रेरणा विजय गजरे (वय १९, रा. मुंदडा नगर, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती आई, वडील, बहीण यांच्यासह राहत होती. यावल येथिल महाविद्यालयात पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती.(केसीएन)दरम्यान, मंगळवारी घरी वाळलेले कपडे गॅलरीतून काढत असताना अचानक तिचा तोल जाऊन ती खाली कोसळली. कुटुंबीय व नागरिकांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासून मयत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.(केसीएन)प्रेरणाचे वडील विजय गजरे हे यावल येथे माजी नगरसेवक होते. रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्रेरणाच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
०००००००००