धरणगाव शहरातील दुर्दैवी घटना
धरणगाव (प्रतिनिधी) :- अंघोळीसाठी इलेक्ट्रीक हिटरने पाणी तापवीत असताना अचानक हिटरचा जोरदार शॉक लागल्याने एका १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.२५ रोजी पहाटे घडली. धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुवर्णा गोकुळ पाटील (वय १९ रा. वर्ष रा. हनुमान नगर, ता.धरणगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. सुवर्णा पाटील ही नेहमी प्रमाणे पहाटे ५ ते साडेपाचच्या सुमारास सकाळी लवकर उठली. त्यानंतर तिने अंघोळीसाठी इलेक्ट्रीक हिटर सुरु केला. पाणी तापल्यानंतर पाणी काढत असताना तिला विजेचा जोरदार धक्का बसला.
कुटुंबीयांनी सुवर्णाला तत्काळ रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक पवन देसले हे करीत आहेत.