देवगिरी बंगल्यावर नेत्यांची गर्दी
मुंबई (प्रतिनिधी) :- या पार्श्वभूमीवर महायुतीत भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवारांची पहिली यादी आज सायंकाळी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या यादीत ३२ ते ३५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. तर यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना देवगिरी बंगल्यावर एबी फॅार्मचे वाटप करत आहेत. त्यामुळे देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाच्या नेत्यांची मोठी गर्दी झाली असून आतापर्यंत १७ उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे.
या नेत्यांना झाले एबी फॉर्मचे वाटप
राजेश विटेकर
संजय बनसोडे
चेतन तुपे
सुनील टिंगरे
दिलीप वळसे पाटील
दौलत दरोडा
राजेश पाटील
दत्तात्रय भरणे
आशुतोष काळे
हिरामण खोसकर
नरहरी झिरवळ
छगन भुजबळ
भरत गावित
बाबासाहेब पाटील
अतुल बेनके
इंद्रनील नाईक
बाळासाहेब आजबे