अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील घटना
निंभोरा येथील समाधान गुलाब पारधी (वय २८) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १६ रोजी त्याची आई लीलाबाई या काकू मंगल पारधी यांना पाहायला गेल्या होत्या. फिर्यादीचा चुलत भाऊ सुभाष दिगंबर पारधी हा फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करू लागला. शिवीगाळ का करतोय, अशी विचारणा समाधान याने केली असता सुभाष याने लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर मारहाण केली. त्यामुळे समाधान बेशुद्ध झाला.
तो शुद्धीवर आल्यावर सुभाष याने शिवीगाळ करत तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. समाधान याने उपचार घेऊन मारवड पोलिसांत तक्रार केली आहे.