अमळनेर शहरातील ढेकू रोडवरील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : भुयारी गटारीच्या चारीत चाक जाऊन ट्रॅक्टर पलटी झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाल्याची घटना दिनांक ११ रोजी सायंकाळी ढेकू रोडवर घडली. याच खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले असल्यामुळे नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.
चोपडा तालुक्यातील वाळकी येथील पांडुरंग शामराव धिवरे यांनी आपला मका विकण्यासाठी अमळनेर बाजार समितीत आणला होता. तेथून ढेकू रोडवरील जीन मध्ये ट्रॅक्टर नेत असताना ढेकू रोडवर भुयारी गटारीसाठी खोदलेल्या चारीत चाक फासून ट्रॅक्टर पलटी झाले. त्यामुळे ट्रॅक्टरमधील मका खाली पडला. शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
भुयारी गटारीचे खड्डे खोदल्यावर ते नीट बुजले गेले नाहीत. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने खड्डयातील माती खाली खचत आहे. आतापर्यन्त याच रस्त्यावर आठ ते दहा मोठी वाहने फसली आहेत.