सोयगाव तालुक्यातील वरठाण येथील घटना
पूजा सोपान संसारे(वय२७)असे गळफास घेवून मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पूजाच्या पश्चात पती, दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे. यात त्यांना वर्षभराचे बाळ आहे. गुरुवारी रात्री विवाहितेने पतीने वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करुन शारिरीक व मानसिक छळ केला. त्यांचे छळास कंटाळून गुरुवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास वरठाण येथे राहते घरी लोखंडी फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली. याप्रकरणी पती सोपान पितांबर संसारे व अन्य एक अशा दोघांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने पती सोपान संसारे (वय ३३) यास शुक्रवारी रात्री बारा वाजता अटक केली.
दरम्यान मृत पूजावर शुक्रवारी दुपारी बनोटी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून सायंकाळी सहा वाजता पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रजाक शेख, संदीप सुसर, राजेंद्र बर्डे, दिलीप पवार, गजानन दांडगे आदी तपास करत आहे. दरम्यान अकरा महिन्याच्या बाळाच्या आईने गळफास घेतल्याने वरठाण सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.