केळी महासंघाचे तहसीलदारांना निवेदन


भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी करणारे निवेदन केळी महासंघाच्या माध्यमातून तहसीलदारांना देण्यात आले आहे. निवेदनाची दखल घेतली नाही, तर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे केळी व कपाशीसह इतर पिकांचे तालुक्यात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा केळी पीक विमा २०२३, २०२४ ची मुदत संपूनही महसूल मंडळ घोषित केलेले नाही. त्यामुळे सर्व महसूल मंडळ घोषित करून, पात्र महसूल मंडळाची यादी जाहीर करावी. कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे करावेत, विमा मंजूर करावा आदी मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार, भडगाव यांना निवेदन दिले.
दखल न घेतल्यास आंदोलन व उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी केळी उत्पादक शेतकरी संघ तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील (बोदडें), जिल्हा उपाध्यक्ष उत्तम पाटील (बात्सर), सचिव नारायण पाटील (पांढरद), तालुका उपाध्यक्ष भूषण पाटील (पिंप्रीहाट) हे सभासद, तसेच भास्कर पाटील (बात्सर), सुधाकर पाटील (वडजी), स्वदेश पाटील (वडजी), विनोद पाटील (पिचर्डे), राजेंद्र पाटील (पिचर्डे), संजय पाटील (सावदे), दिलीप पाटील (सावदे) आदी उपस्थित होते.









