• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

महिलेसह कुटुंबीयांना मारहाण; सोन्याचे दागिने तुटून नुकसान, जीवे मारण्याची धमकी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 18, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

महिलेसह कुटुंबीयांना मारहाण; सोन्याचे दागिने तुटून नुकसान, जीवे मारण्याची धमकी

पाचोरा : मागील भांडणाच्या कारणावरून शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगाव (ता. पाचोरा) येथे दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिसांनी सरपंचासह सुमारे ४५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीत महिलेसह तिच्या कुटुंबीयांना दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शेळ्यांचे शेड तोडल्याचा आरोप

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, रूपाली खुशाल पाटील (वय २५, रा. दामजी नगर, पाचोरा) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ७.४५ वाजता जारगाव येथे आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून तक्रारदाराच्या घोड्यांना बांधण्यासाठी असलेल्या शेडमधील दोर कापून घोडे सोडून दिल्याचा आरोप आहे.तसेच जेसीबी मशीनच्या साहाय्याने पत्री शेड तोडून नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार आणि त्यांचे पती खुशाल सुधाकर पाटील यांनी शेड तोडू नये, अशी विनंती केली असता वाद आणखी चिघळला.

पतीवर काठीने हल्ला

यानंतर आरोपींनी तक्रारदाराच्या पतीला काठी व रॉडने मारहाण केली. मारहाणीत ते बेशुद्ध झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यांना वाचवण्यासाठी तक्रारदार आणि त्यांची आजी-सासू गेल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.यावेळी आरोपी भावेश सुनील पाटील याने तक्रारदाराच्या पोटात लाथ मारल्याचे, तर सुनील सरपंचाने तक्रारदाराच्या डोक्याचे केस धरून ओढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच तक्रारदाराच्या आजी-सासूला चापट व पायाने मारहाण केल्याचा आरोप आहे.

सोन्याचे दागिने तुटून नुकसान

मारहाणीच्या वेळी तक्रारदाराच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढल्याने त्यातील दोन सोन्याचे पोहे तुटून पडले आणि नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच तक्रारदार, त्यांचे पती, सासरे आणि लहान मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या कामासाठी येणारे संकेत गोकुळ धनगर आणि रोहन कालिदास नेतकर यांनाही आरोपींनी रॉड, काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

विविध कलमांन्वये गुन्हा

या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११८(१), ११५(२), ३२४, ३५१(२) आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात सरपंच सुनील पाटील, भावेश सुनील पाटील, मोट्या प्रताप पाटील यांच्यासह जारगाव येथील इतर सुमारे ४० ते ४५ जणांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद आहे.पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू असून, पुढील तपास पोलीस हवालदार संजय माधव काळे करीत आहेत.


 

 

Previous Post

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

August 18, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

राजणगाव शिवारात पत्राचे शेड फोडून ७५ हजार रुपयांचे १० बोकड व ५ शेळ्या लांबवल्या; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon