जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे नायगाव शिवारात एका गोठ्यामध्ये हिंस्र प्राण्याने म्हशीच्या पारडूवर हल्ला करून त्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


शिरसोली येथे राहणारे रघुनाथ रामदास माळी उर्फ बापू माळी यांच्या मालकीच्या शेतामध्ये त्यांनी २१ गुरे बांधून ठेवली होती. त्यामध्ये काही म्हशी व म्हशींचे पारडू देखील होते. रात्री साधारण १२ ते ४ वाजेच्या दरम्यान अज्ञात हिस्त्र प्राण्याने गोठ्यात प्रवेश करून पारडूवर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली.
जवळच मंगळवारी असलेल्या यात्रेनिमित्त सज्जनशहा बाबांच्या दर्ग्यांसाठी ग्रामस्थांची तयारी सुरू होती. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.









