अमळनेर तालुक्यातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : पिंपळीतून दहीवद फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रुपचंद झगा महाजन यांच्या शेताजवळ दोन दुचाकींच्या धडकेत सुरेश पुंडलिक महाजन यांचा मृत्यू झाला तर अन्य एक जखमी झाल्याची घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत संजय पिंताबर शेलकर (५४, पिंपळी) यांनी फिर्याद दिली आहे. नासीर महेमुद फकीर (दहीवद, ता. अमळनेर) (एमएच१९/डीआर ३७०६) दुचाकीने जात असताना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पिंपळे ते दहिवड फाट्याकडे जाणाऱ्या रोडवर त्याने दुचाकी ही भरधाव वेगात नेली. यावेळी फिर्यादीचे आतेभाऊ सुरेश पुंडलिक महाजन (५३, पिंपळी, ता. अमळनेर) यांच्या दुचाकीला (एमएच१९/एफ५६१९) जोरदार धडक दिली.
या अपघातात नासीर जखमी झाला असून सुरेश पुंडलिक महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नासीर महेमुद फकीर याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय भोई करीत आहेत.