अंबाडी धरण परिसरातील घटना ; दोघांविरुद्ध गुन्हा
पहूर. ता. जामनेर : पोलिस स्टेशन पहुर येथील अधिकारी, अंमलदार यांनी अंबाडी धरण परिसरात छापा टाकून विनोद हुसेन तडवी व कबीर शेखलाल तडवी रा. चिलगाव यांच्या मालकीच्या, अवैध बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी तयार करण्याकरीता वापरण्यात येणारे अंदाजे ३५ हजार किमतीचे १६०० लिटर कच्चे रसायन हे जागीच नष्ट करण्यात आले.
याप्रकरणी दोघांवर दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोस्टेचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांचे मार्गदर्शना अंतर्गत पीएसआय भरत दाते, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण पाटील, पोलीस अमलदार विनोद देशमुख, राहुल पाटील, ज्ञानेश्वर ठाकरे, गोपाल गायकवाड, विजय पाटील यांनी पार पाडली.