जामनेर तालुक्यात भागदरा येथे कारवाई
जामनेर (प्रतिनिधी) : येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत जामनेर तालुक्यातील भागदरा येथे पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गावामध्ये हातभट्टीवर कारवाई केली आहे. पोलिस कर्मचारी पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय खंडारे,ज्ञानेश्वर देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल सुशील सत्रे यांनी कारवाई केली आहे.
यावेळी पाेलिसांनी १ लाख रुपयांची गावठी दारू व कच्चे रसायन नष्ट केले. पाेलिसांनी भागदरा येथे गणेश देविदास जोगी व नामदेव देविदास जोगी (रा. भागदरा, ता. जामनेर) यांच्यावर कारवाई केली. यावेळी पोलिसांनी जवळपास १ लाख रुपयांची गावठी हातभट्टीची दारू व रसायन नष्ट केले. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतुक व समाधान व्यक्त केले.