बॅग स्कॅनिंग करताना उघड झाली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ रेल्वे स्थानकावर पोलिसांनी १७ किलो गांजा जप्त केला आहे. बॅग स्कॅनिंग करीत असताना संशयास्पद वस्तू असल्याचे दिसून आले. तपासणी केली असता त्यात गांजा निघाला आहे.
भुसावळ रेल्वे स्थानकाच्या साऊथ साइड बॅग स्कॅनर मशीन येथे गुरुवारी दि. २९ ऑगस्ट रोजी तैनात पी.ए. जोगिंदर नेरपगार आणि एमएसएफचे कर्मचारी दीपक वसंत बाविस्कर यांनी दोन्ही संशयितांची बॅग स्कॅनिंगद्वारे तपासली. या बॅगमध्ये काही संशयास्पद वस्तू दिसल्या आणि त्यांना थांबवल्यानंतर ते पळू लागले आणि गर्दीचा फायदा घेत ते पळून गेले.
सदर माहिती मिळताच निरीक्षक पी.आर. मीना, एसआयपीएफ एन. के सिंग आणि सीपीडीएस टीमचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. माहिती मिळताच सहाय्यक सुरक्षा आयुक्त भुसावळ अशोक कुमार हे प्रतिबंधित वस्तूंच्या संशयावरून नियमानुसार कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. बॅग तपासल्या असता दोन्हीमध्ये खाकी टेपने झाकलेले ९ बंडल दिसले.
दोन्ही पिशव्यांमध्ये सापडलेले बंडल चिन्हांकित करून उघडले असता त्यामध्ये बंदी असलेला गांजा आढळला. ज्याचे वजन काटा धारकाने पंचांसमोर केले. ज्यात वरील ९ बंडलमध्ये सापडलेल्या गांजाचे एकूण वजन १७ किलो आढळून आले, ज्याची अंदाजे एकूण किंमत १ लाख ७० हजार रुपये आहे. पुढील कारवाईसाठी जीआरपी भुसावळकडे गांजा सुपूर्द करण्यात आला.याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून जीआरपी, बीइसएलद्वारे तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, जीआरपी /बीइसएल सोबत एक टीम तयार करून संशयित आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.