जळगाव शहरातील टॉवर चौक येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शॉर्टसर्कीट होऊन आकाश एनएक्स फुटवेअर या दुकानाला आग लागून दुकानात भरलेल्या मालासह फर्निचर जळून २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी पहाटे टॉवर चौक परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील टॉवर चौकातील दौलत बाजार परिसरात पवन केसवाणी यांचे आकाश एनएक्स फुटवेअर या नावाचे दुकान आहे. पहाटे अचानक शॉर्टसर्कीट होऊन आग लागली. यात दुकानात भरलेला माल, फर्निचर जळाले. आगीची घटना समजताच अग्नीशमन बंब पोहचला व आग नियंत्रणात आणली. या आगीत २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.