स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
एरंडोल(प्रतिनिधी ) शहरातील 20 वर्षीय तरुण गावठी पिस्टल बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने संशयीताला अटक केली. संशयीताकडून 25 हजार रुपये किंमतीची शहरातून चोरी केलेली दुचाकी जप्त करण्यात आली. प्रवीण रवींद्र बागुल (20, केवडीपुरा, एरंडोल) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना एरंडोल शहरातील संशयीत चोरीची दुचाकीसह गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. शनिवार, 17 ऑग्स्ट रोजी संशयीताच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचा कट्टा व 25 हजार रुपये किंमतीची शहरातून चोरी केलेली दुचाकी जप्त करण्यात आली.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हवालदार नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, राहुल कोळी, रवी कापडणे, चालक महेश सोमवंशी आदींच्या पथकाने केली.