• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सांडव्याच्या पाण्यात भाऊ बुडाला ; रक्षाबंधनाच्या दिवशीच देवाघरी निघून गेला !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
सांडव्याच्या पाण्यात भाऊ बुडाला ; रक्षाबंधनाच्या दिवशीच देवाघरी निघून गेला !

यावल तालुक्यातील निंबादेवी धरण परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना 

जळगाव (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील निंबादेवी धरण येथे मित्रांसह पर्यटनासाठी व पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून तो खड्ड्यात पडल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी सोमवार दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. घटना प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-19-at-18.24.24-1.mp4

वेदांत सुवर्णसिंग पाटील (वय २०, रा. निमगाव ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो निमगाव येथे आई-वडील, बहिण यांच्यासह राहत होता. वडील शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात.(केसीएन)दरम्यान, सोमवारी दि. १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधननिमित्त सुट्टी असल्यामुळे निमगावातील काही तरुणांसोबत वेदांत पाटील हा निंबादेवी धरण येथे पोहोचण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी अचानक त्याचा पाय घसरून तो पाण्यातला खड्ड्यात पडल्याने बुडायला लागला.

दरम्यान, त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केली. त्यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेत पाण्यात उडी घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला. या वेळेला काही तरुणांनी त्याला सीपीआर देऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.(केसीएन)त्यानंतर त्याला किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासून त्यास मयत घोषित केले.

दरम्यान, यावेळी वेदांत पाटीलच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. डोळ्यांसमोर मित्र बुडाल्याने मित्रांना शोक अनावर झाला होता. यावल पोलीस यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. (केसीएन)एकुलता एक मुलगा व बहिणीच्या पाठीवरील एकुलता भाऊ ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी मृत्युमुखी पडल्याने पाटील कुटुंबीयांना धक्का बसला आहे. निमगाव गावामध्ये शोककळा पसरली आहे.


 

 

Tags: #crimenimbadevi damyawal
Previous Post

निष्णात हृदयरोग तज्ज्ञ डॉ.सुभाष चौधरी अनंतात विलीन

Next Post

गावठी पिस्तूल दाखवून दहशत माजविणारा जेरबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी पिस्तूल दाखवून  दहशत माजविणारा जेरबंद

गावठी पिस्तूल दाखवून दहशत माजविणारा जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon