जामनेर तालुक्यातील पहूर येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री वाकोद गावाजवळील जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर घडली.
जामनेर तालुक्यातील वाकोद गावाच्या पुढे अज्ञात वाहनाच्या धडकेने एका ४० वर्षीय अज्ञाताचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११च्या सुमारास घडली. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी केले आहे.