जळगाव शहरातील सद्गुरु नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सदगुरू नगरातील एका महिलेच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. घरातून १५ हजारांची रोकड आणि चांदीच्या वस्तू असा एकुण १५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना मंगळवार दि. २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सदगुरू नगरातील तृप्ती कॉर्नर येथे जयश्री मयूर वाणी यांच्या आईचे घर आहे. सोमवार दि. २२ जुलै ते दि. २३ जुलै दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या आईच्या घरात घुसून घरातील लोखंडी कपाटातून १५ हजारांची रोकड आणि चांदीच्या वस्तू असा एकुण १५ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी दि. २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आले.
त्यानंतर जयश्री वाणी यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार दुपारी साडेसात वाजता पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहे.