जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेंदुर्णी येथे आषाढी एकादशीच्या दिवशी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याप्रकरणी पहूर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पहूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी विजयकुमार विश्वासराव पाटील हे आषाढी एकादशीच्या दिवशी बंदोबस्तावर होते. त्यावेळी संशयित आरोपी अक्षय नंदू निकम (३२) व देवीदास छगन निकम (५८) यांनी त्यांना सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.
यानंतर विजयकुमार पाटील यांनी पहूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे त्यानुसार दोघं संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.