जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील रामेश्वर कॉलनीतील ३२ वर्षीय हद्दपार आरोपी हा परिसरात अडीच फुट लांबीची तलवार घेऊन दहशत माजवताना आढळला आहे. त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशुतोष सुरेश मोरे (वय ३२) हा मंगळवारी दि. १६ जुलै रोजी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास तलवार घेऊन फिरत असल्याची फिर्याद पोलिस कॉनटेबल गणेश ठाकरे यांनी दिली. त्याच्या विरुद्ध हदपारीची कारवाई झालेली असताना तो शहरात तलवारीसह फिरत होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.