• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत आईसह दोन मुले ठार, एक गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2024
in अपघात, जळगाव
0
भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत आईसह दोन मुले ठार, एक गंभीर जखमी

जळगाव तालुक्यातील रामदेववाडीजवळ घटना

संतप्त जमावाकडून रास्ता रोको करून दगडफेक

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ मंगळवारी दि. ७ मे रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील आई व २ मुले ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेत आणखी १२ वर्षाचा मुलगा हा जबर जखमी झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

राणी सरदार चव्हाण (वय ३०), सोमेश सरदार चव्हाण (वय २), सोहन सरदार चव्हाण (वय ७, सर्व रा. रामदेववाडी, जळगाव) असे मयत आई व मुलांचे नाव आहे. त्यांचा परिवार मोलमजुरी करून उदरर्निर्वाह करतो. मंगळवारी दि. ७ मे रोजी राणी चव्हाण या दोन्ही मुले सोहन व सोमेश चव्हाण आणि लक्ष्मण भास्कर राठोड (वय १२) यांच्यासह जळगावी कामानिमित्त निघाल्या होत्या. गावाच्या बाहेर आल्यावर अचानक आलेल्या एम एच १९ सी.व्ही. ६७६७ या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तिन्ही मुले एका बाजूला फेकल्या गेल्या. त्यात राणी चव्हाण व सोमेश या रस्त्यावर आपटून जागीच ठार झाल्या. त्यासह डोक्याला मार लागल्याने सोहन याचादेखील मृत्यु झाला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/05/VID-20240507-WA0051.mp4

अपघाताची माहिती मिळताच रामदेववाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनस्थळी जमा झाले. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको केला. सोहन चव्हाण व लक्ष्मण राठोड यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा सोहन याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन लोकांशी संवाद साधला. दरम्यान, दोन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/05/VID-20240507-WA0045.mp4

घटनास्थळी दगडफेक, दोन पोलीस जखमी
दरम्यान घटनास्थळी अपघात झाल्याची माहिती मिळताच जमावाने रास्ता रोको केला. या ठिकाणी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव प्रक्षुब्ध् झालेला होता. यामुळे चार तास राणी चव्हाण व सोमेश यांचा मृतदेह घटनास्थळीच होता. घटनास्थळी जमावाने दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन प्लाटून बोलावल्या. त्यानंतर काही वेळाने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणून जमावाला शांत करण्यात यश मिळाले. या दगडफेकीत दंगा नियंत्रण पथकाचे उमेश ज्ञानोबा गायकवाड (वय ३०) आणि एक महिला पोलीस जखमी झाले आहे. दरम्यान, दगडफेकीप्रकरणीदेखील गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.


 

 

Previous Post

भरधाव क्रेटा कारने दुचाकीला दिली भीषण धडक, दोन तरुणांचा मृत्यू

Next Post

रामदेववाडी अपघातातील चौथ्या जखमी तरुणाचा मध्यरात्री मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रामदेववाडी अपघातातील चौथ्या जखमी तरुणाचा मध्यरात्री मृत्यू

रामदेववाडी अपघातातील चौथ्या जखमी तरुणाचा मध्यरात्री मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon