जळगाव तालुक्यातील भादलीजवळ घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील भादली ते जळगावदरम्यान रेल्वेरुळावर एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह गुरुवारी दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आढळून आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर तरुणाची अद्यापि ओळख पटलेली नाही. त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत चेंदामेंदा झाल्यामुळे तसेच, कपड्यांमध्ये कुठलेही कागदपत्र आढळून आलेले नाही. भादली ते जळगावदरम्यान खांब क्रमांक ४३६/१५ जवळ या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. नशिराबाद्चे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांचे मार्गदर्शनाखाली पोकॉ प्रवीण लोहार हे तपास करीत आहेत. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन नशिराबाद पोलिसांनी केले आहे.