जळगाव (प्रतिनिधी) : जळगांव लोकसभा निवडणूकीसाठी चौथ्या दिवशी दि. २२ एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ९ उमेदवारांनी २२ अर्ज घेतले. जळगाव लोकसभा मतदार संघासाठी एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला.
लोकसभा मतदारसंघासाठी सचिन विष्णू घोडेस्वार, जळगाव (अपक्ष), प्रदीप भीमराव मोतीराया चांदसर ता. धरणगाव (अपक्ष), प्रदीप भीमराव मोतीराया यांनी सुनंदाबाई भीमराव मोतीराया( भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), विलास देवराम कोळी, कळमसरे, ता. अमळनेर (अपक्ष), किरण ब्रिजलाल कोळी, जळगाव (अपक्ष) , दीपक सुखदेव सोनार,जळगाव यांनी लीना शाम पाटील ( अपक्ष), ज्ञानेश्वर मगनपुरी गोसावी, जळगाव(आम जनता पार्टी), इनेश एकनाथ राठोड, लोंजे ता. चाळीसगाव (अपक्ष), गौरव दामोदर सुरवाडे, जळगाव (अपक्ष) असे एकूण ९ उमेदवारांनी २२ अर्ज घेतले आहेत.