चाळीसगावात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मॅनेजरला लुटले
चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील गणेशपुर येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेचे मॅनेजरला खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून १५ हजार रुपयांची रोकड दोन अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना आज शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनलागुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर हे कमर्चाऱ्यांसह खडकी शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गणेशपूर शाखेवर कामांवर जात होते. खडकीजवळील पुलाचे काम चालू असल्याने वळण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी मोटरसायकलवर आलेल्या व तोंडावर पट्टी बांधलेल्या दोन अज्ञात युवकांनी त्यांना खेळण्यातील एअरगन बंदुकीचा धाक दाखविला. त्यांच्या जवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. बॅग मॅनेजर देत नाही म्हणून लूटारूनी त्यांच्या जवळील लोखंडी रॉडने मारहाण करून मॅनेजर यांना जखमी केले.
यावेळी खडकी बु येथे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.