जळगाव (प्रतिनिधी) :- येथील गोदावरी फाऊंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालयांमध्ये ध्वजवंदन, देशभक्तीपर कार्यक्रम घेण्यात आले.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात संस्थेच अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य सादर केले. कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोळंखे, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड,वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. बापुराव बिटे, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य विशाखा गणविर, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर,होमीओपॅथी महाविद्यालयाचे डॉ. डी.बी.पाटील, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदीकचे प्राचार्य डॉ. हर्षल बोरोले,कृषि संचालक प्रा सतिष सावके, डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नसिर्र्ंगचे प्राचार्य शिवानंद बिरादर, डॉ. माया आर्विकर, प्रा सुरेंद्र गावंडे यांच्यासह पालक, विद्यार्थी व महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त संबोधीत केले.