जळगावाच्या नवीपेठेतील हॉटेलात घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- पेवर मशिनचे पैसे व क्रॉक्रीट प्लँन्ट मशीनची ॲडव्हान्स रक्कम परत द्यावी,यासाठी ठाणे येथील कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला धमकावून हॉटेलमध्ये डांबुन ठेवल्याचा प्रकार शहरात समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद वसंत लिंगे (५२) हे हायलॅन्ड गार्डन,ढोकाळी ठाणे येथे वास्तव्यास असून ते नोकरी करतात. ते कामानिमित्त जळगाव येथे आले होते. त्यांना संशयित आरोपी रविंद्र माळी तसेच राहुल सोनवणे (दोन्ही रा.जळगाव) यांनी कंपनीच्यावतीने रोड पेवर मशिन तसेच काँक्रीट प्लॅन्ट मशीन दिले होते. या मशिनरीची ॲडव्हान्स रक्कम परत द्यावी,यासाठी प्रसाद लिंगे यांना दोघांनी नवीपेठेतील हॉटेल अशोका पॅलेस येथे २८ नोव्हेबर ते ३ डिसेंबर रात्री साड़ेआठ वाजेपावेतो डांबुन ठेवले.
याप्रकरणी प्रसाद लिंगे यांच्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात मानसिक व शारीरिक छळ तसेच जबरदस्तीने डांबुन ठेवले म्हणुन गुन्हा सोमवार २५ रोजी दाखल झाला. यामुळे खळबळ उडाली असून तपास सफौ संजय बडगुजर करत आहेत.