नगरसेवक मानसी भोईटे व अरविंद देशमुख यांचे सहकार्य
जळगाव, (प्रतिनिधी) :- पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘प्रहार – द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाचा जळगाव शहरातील सर्व पत्रकार बांधवांसाठी विशेष शो आयोजित करण्यात आला आहे. शहरातील सर्व पत्रकार संघटना एकत्र येऊन पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम पत्रकार मित्र मंडळाच्या माध्यमातून या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.


रविवार, १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २:४५ वाजता जळगाव शहरातील नटवर कॉम्प्लेक्स येथील पीव्हीआर सिनेमागृहात हा विशेष शो होणार आहे. या उपक्रमाला जळगाव महानगरपालिकेच्या नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या मानसी निलेश भोईटे आणि नगरसेवक अरविंद देशमुख यांचे सहकार्य लाभले आहे. या विशेष चित्रपट प्रदर्शनासाठी पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम आणि ॲड. अनिकेत निकम स्वतः उपस्थित राहणार आहेत.
मुंबईवरील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका देशाच्या न्यायालयीन इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान मानली जाते. देशाच्या सुरक्षिततेला आव्हान देणाऱ्या दहशतवादी कारवायांशी संबंधित खटल्यांमध्ये त्यांनी न्यायालयासमोर मांडलेली प्रभावी बाजू देशवासीयांच्या स्मरणात कायम राहणारी आहे.
जळगाव शहरातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन या विशेष चित्रपट प्रदर्शनाचा पुढाकार घेतला आहे. या विशेष प्रदर्शनाचा लाभ शहरातील सर्व पत्रकार बांधवांनी घ्यावा, असे आवाहन पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम पत्रकार मित्र मंडळ व शहरातील सर्व पत्रकार संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.








