जळगाव (प्रतिनिधी) :- जैन उद्योग समुहाचे संस्थपाक भवरलाल जैन यांचा ८६ वा वाढदिवस आणि जैन इरिगेशनचे सहकारी मदन लाठी यांचे आजचे ८६ वे रक्तदान हा एक योग योगच म्हणावा लागेल. आतापर्यंत त्यांनी विविध प्रसंगी रक्तदान करून एक रक्तदान या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले आहे.
त्यांनी पहिल्या करोना काळात नोव्हेंबर २० व १२ डिसेंबर २०२० रोजी प्लाझ्मा देऊन सोलापूरचे घाडगे याना & इतर तीन रुग्णास त्या काळात जीवनदान मिळाले होते. त्यावेळी मदन लाठी याना विविध संस्थांनी कोरोना योद्धा सन्मानपत्र दिले होते & सत्कार केला होता. २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठे भाऊंचे स्मृतिदिनानिमित्त सुद्धा त्यांनी रक्तदान केले होते.