चंद्रकांत गवळी यांची नाशिकला बदली
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस दलातील अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह काही अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आदेश गृह विभागाने सोमवारी काढले असून असून चंद्रकांत गवळी यांच्या जागी नाशिक येथून अशोक नखाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने रात्री उशीरा वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात जळगावचे अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचा देखील समावेश आहे. त्यांची नाशिक येथील गुप्तचर प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, त्यांच्या जागी गुप्तचर प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असणारे अशोक नखाते यांची बदली करण्यात आली आहे.