भुसावळ ( प्रतिनिधी ) – एकाने चाकू दाखवून मोबाईल व खिश्यातील रोकड असा एकुण १२ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल शहरातील रजा टॉवर जवळ जबरी चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र रामनारायण यादव (वय-२१) रा. मास्टर कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह राहायला आहे. सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने महेंद्र यावद हा भुसावळ शहरात गेला होता. त्यावेळी शहरातील रजा टॉवर येथे सुरज भांगे ( रा. भुसावळ ) याने चाकूचा धाक दाखवत महेंद्रचा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकुण १२ हजार २०० रूपये किंमतीच जबरी काढून चोरी केल्याची घटना घडली. घाबरलेल्या अवस्थेत महेंद्र यादव याने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून दुपारी ३ वाजता संशयित आरोपी सुरज भांगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये करीत आहे.